Pune Crime : भाग्येश ओसवालला ठाण्यात खाण्याची सोय; पार्सलमध्ये कोल्ड कॉफी, बर्गर, कोल्ड ड्रिंक
Pune Crime News Updates : पुण्यात काल BMW कारमध्ये मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दोन तरुणांनी अश्लील चाळे केल्याची घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांनी या तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यावर त्यांच्या खाण्याची सोय त्यांच्या मित्रांकडून करण्यात आल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
पुण्यात भरचौकात लघुशंका करत अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजा आणि भाग्येश ओसवाल या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केल्यानंतर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणल्यावर भाग्येशच्या मित्राने त्याच्यासाठी खाण्याचे पार्सल आणले होते. या बॉक्समध्ये कोल्ड कॉफी, बर्गर आणि कोल्ड ड्रिंक होतं. मात्र त्याठिकाणी माध्यमांचे कॅमेरे असल्याने पोलिसांनी त्यांना हुसकावून लावलं.
पुण्यात काल सकाळच्या वेळेला BMW कारमध्ये मद्यधुंद अवस्थेत असलेला गौरव आहुजा या तरुणाने रस्त्यावरच अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली होती. गौरवसोबत त्याचा मित्र भाग्येश ओसवाला देखील कारमध्ये होता. येरवडा परिसरात हा संपूर्ण प्रकार घडला. या तरुणाने रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या महिलांसोर अश्लिल चाळे केले. यानंतर त्या तरुणाने सिग्नलवर लघुशंका केली. या संपूर्ण घटनेनंतर येरवडा पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेत त्यांची वैद्यकीय तपासणी आणि चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणलं तेव्हा भाग्येश ओसवालच्या मित्राने त्याच्या खाण्यासाठी पार्सल आणलं होतं. या पार्सलमध्ये कोल्ड कॉफी, बर्गर आणि कोल्ड ड्रिंक होते. मात्र याठिकाणी माध्यमसमूहांचे कॅमेरे असल्याने पोलिसांनी हे पार्सल घेऊन आलेल्या तरुणाला तिथून हुसकावून लावल्याचा प्रकार समोर आला आहे.

नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल

ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान

सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती

'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
