Pune Crime Video : पुण्यात नेमकं घडतंय काय? एकाच दिवसात ७ जणांनी आयुष्य संपवलं; टोकाचा निर्णय घेत…
पुणे शहरात विविध ठिकाणी एकाच दिवशी टोकाचं पाऊल उचलत सात जणांनी आयुष्य संपवलं, पुण्यातील पिंपरी-चिंचवड या भागात एकाच दिवसात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे पुणेकरांमध्ये कमालीची चिंता व्यक्त केली जात आहे.
पुणे शहरात विविध ठिकाणी एकाच दिवशी टोकाचं पाऊल उचलत सात जणांनी आयुष्य संपवल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे घटनांवर चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कारण पुण्यातील पिंपरी-चिंचवड या भागात एकाच दिवसात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे पुणेकरांमध्ये कमालीची चिंता व्यक्त केली जात आहे. सातही घटनांमध्ये टोकाचं पाऊल उचलण्याची वेगवेगळी कारणं आहेत. मात्र, एकाच दिवशी शहरात एवढी मोठी घटना घडल्याने सर्वच हादरून गेले आहेत. पिंपरी चिंचवड शहरात एकाच दिवसात ७ जणांनी टोकाचं पाऊल उचलल्याने पिंपरी-चिंचवड शहर एकच हादरलं आहे. या सात जणांपैकी सहा जणांनी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलंय तर एकाने इमारतीवरून उडी घेत टोकाचं पाऊल उचललं आहे. पुण्यातील रावेत, हिंजवडी, वाकड, सांगवी आणि चिखली या भागातील या धक्कादायक घटना घडल्या आहेत.
टोकाचं पाऊल उचलण्याच्या घटनेत सहा पुरूष तर एका महिलेचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील चाकण भागात गौरव अगम या तरुणाने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलंय. रावेत भागात राहणाऱ्या प्रसाद संजय अवचट या तरुणाने दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास आपलं जीवन संपवलं. भोसरी भागातील तिसर्या घटनेत विकास मुरगुंड या व्यक्तीने गळफास घेतला. हिंजवडी परिसरातील मनाप्पा चव्हाण या व्यक्तीने गळफास घेत टोकाचं पाऊल उचललं आहे. तर वाकड भागातील नवनाथ भगवान पवार यांनी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं. सांगवी भागातील सुवर्णा पवार या महिलेने गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. तर चिखली मधील इमारतीवरून उडी मारून दिनेश लोखंडे या व्यक्तीने टोकाचं पाऊल उचललं आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

