मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट, महायुतीत धुसफूस कायम
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार स्मिता जाधव यांनी मंत्री शंभूराज देसाईंची भेट घेतली. या भेटीनंतरही महायुतीमधील अंतर्गत धुसफूस कायम असल्याचे समोर आले आहे. कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर झाल्याशिवाय अधिकृत पाठिंबा देणार नाही, असे स्पष्टीकरण मंत्री शंभूराज देसाईंनी दिले आहे. शिवसैनिकांच्या मनातील शंका दूर झाल्यानंतरच शिवसेनेचा पाठिंबा जाहीर केला जाईल.
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव यांनी नुकतीच मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. या भेटीनंतरही महायुतीमधील अंतर्गत धुसफूस कायम असल्याचे चित्र आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबत आपले स्पष्टीकरण दिले आहे की, “कार्यकर्त्यांचा संभ्रम दूर झाल्याशिवाय अधिकृत पाठिंबा दिला जाणार नाही.” शंभूराज देसाई यांनी पुढे स्पष्ट केले की, “महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत. मात्र, खालील स्तरावरील कार्यकर्त्यांमध्ये आणि काही पदाधिकाऱ्यांमध्ये थोडा संभ्रम निर्माण झालेला आहे.
हा संभ्रम दूर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.” एकदा या काही गोष्टी स्पष्ट झाल्यावर तो संभ्रम निश्चितपणे दूर होईल आणि त्या लवकर दूर झाल्यास शिवसेना एक मोठा मेळावा घेऊन स्मिता जाधवांना आपला पाठिंबा जाहीर करेल, असेही देसाई यांनी नमूद केले. तत्पूर्वी, पदाधिकाऱ्यांच्या, शिवसैनिकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रम व शंका दूर होणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. महायुतीमधील या अंतर्गत मतभेमांमुळे पुणे पदवीधर मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेगळे वळण लागल्याचे दिसून येत आहे.
