Pune Jain Boarding : जैन बोर्डिंग डील रद्द, गोखले बिल्डरचीही माघार, 230 कोटींबाबतही मोठा निर्णय समोर!
पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार अखेर रद्द झाला आहे. गोखले बिल्डरने नैतिकतेच्या मुद्द्यावर व्यवहारामधून माघार घेतली. या प्रकरणात मुरलीधर मोहोळ यांचे नाव विनाकारण ओढले जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, तर विरोधकांनी मोहोळांच्या राजीनाम्याची मागणी केली. जैन समाजाकडून कठोर कारवाईची मागणी कायम आहे.
पुण्यातील बहुचर्चित जैन बोर्डिंग जमीन व्यवहार अखेर रद्द झाला आहे. गोखले बिल्डरने रविवारी रात्री या व्यवहारातून माघार घेतल्याची माहिती ट्रस्टींना ईमेलद्वारे दिली. नैतिकतेचा मुद्दा आणि जैन धर्मीयांच्या भावना दुखावण्याची इच्छा नसल्याचे कारण बिल्डरने दिले. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री अमित शहा मुंबईत येण्यापूर्वीच ही माघार घेण्यात आली. या प्रकरणात मुरलीधर मोहोळ यांचे नाव गोवण्यात येत असल्याच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची पाठराखण केली.
पुण्याची जनता सुज्ञ असून त्यांना सर्व परिस्थितीची जाणीव आहे, असे फडणवीस म्हणाले. दुसरीकडे, काँग्रेसने मोहोळांच्या राजीनाम्याची मागणी करत या प्रकरणातील तिसरा अंक बाकी असल्याचा इशारा दिला आहे. धर्मदाय आयुक्तांनी या व्यवहाराचे २३० कोटी रुपये गोठवले आहेत. जैन मुनींनी व्यवहार रद्द झाल्याचे पुरावे मिळत नाहीत तोवर आंदोलनाचा इशारा दिला आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

