Pune | पुण्यात विषारी दारूकांडाचा थरार! 15 मृत्यूंनी राज्य हादरलं; मुख्य आरोपी अखेर जेरबंद

Pune | पुण्यात विषारी दारूकांडाचा थरार! 15 मृत्यूंनी राज्य हादरलं; मुख्य आरोपी अखेर जेरबंद

| Updated on: May 29, 2026 | 1:10 PM

पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात घडलेल्या विषारी दारूकांडामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसांत या दोन्ही शहरांमध्ये एकूण 15 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 11 जणांचा मृत्यू विषारी दारू प्यायल्यामुळे झाल्याची माहिती समोर आली आहे. उर्वरित चार जणांचा मृत्यू इतर कारणांमुळे झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, या प्रकरणातील मोठी अपडेट समोर आली असून विषारी दारूकांडातील मुख्य आरोपी कर्नलसिंह विरखा याला पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वी या प्रकरणात योगेश वानखेडे याला अटक करण्यात आली होती. आतापर्यंत या प्रकरणात एकूण आठ आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून मुख्य आरोपीच्या अटकेनंतर तपासाला अधिक वेग आला आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी या अटकेची अधिकृत माहिती दिली. विषारी दारूचा पुरवठा नेमका कुठून झाला, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सध्या पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे.

मुख्य आरोपी कर्नलसिंह विरखा याच्या अटकेनंतर या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या भीषण घटनेमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Published on: May 29, 2026 1:10 PM
Follow Us