Pune | इतर दुकानांवर कारवाई, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांकांच दुकानं मात्र सुरु

पुण्यात दुजाभाव का असा सवाल इथल्या व्यापाऱ्यांकडून केला जात आहे. तर सरकारच्या निर्णयाविरोधात जात दुकाने संध्याकाळी 7 पर्यंत सुरुच ठेवणार असल्याची भूमिका पुण्यातील व्यापाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे आज दुपारी 4 नंतर सुरु असणारी दुकानं पोलिसांकडून बंद करण्यात येत आहेत.

राज्यातील 22 जिल्ह्या कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आलीय. मुंबई आणि ठाण्यातही व्यापारी वर्गाला मोठा दिलासा देण्यात आलाय. कारण, दुकाने रात्री 10 वाचेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. दुसरीकडे पुण्यात मात्र दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंतच सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यात दुजाभाव का असा सवाल इथल्या व्यापाऱ्यांकडून केला जात आहे. तर सरकारच्या निर्णयाविरोधात जात दुकाने संध्याकाळी 7 पर्यंत सुरुच ठेवणार असल्याची भूमिका पुण्यातील व्यापाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे आज दुपारी 4 नंतर सुरु असणारी दुकानं पोलिसांकडून बंद करण्यात येत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI