भुशी डॅम परिसरात नाकाबंदी, पोलिसांची नजर चुकवत पर्यटकांची धबधब्यांवर गर्दी

पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या लोणावळ्यातील भुशी धरण परिसरात (Bhushi Dam) पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे.

पुणे : पावसाळी वातावरणात पर्यटकांची पावलं आपसूकच धरणं, धबधबे यासारख्या ठिकाणी वळतात. पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या लोणावळ्यातील भुशी धरण परिसरात (Bhushi Dam) पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे. शनिवारी पर्यटकांनी गर्दी केल्याचं वृत्त ‘टीव्ही9 मराठी’ने दाखवल्यानंतर प्रशासनाने कारवाई केली. मात्र पोलिसांची नजर चुकवत पर्यटकांनी परिसरातील धबधब्यांकडे कूच केलं. मात्र भुशी धरण परिसराआधी जे धबधबे आहेत त्या धबधब्यांवर पोलिसांची नजर चुकवत पर्यटकांनी गर्दी केली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI