Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune News : कारागृह पोलीस भरतीसाठी 3 हजार मुलींची गर्दी; गोंधळ उडल्याने दुखापत

Pune News : कारागृह पोलीस भरतीसाठी 3 हजार मुलींची गर्दी; गोंधळ उडल्याने दुखापत

| Updated on: Mar 19, 2025 | 6:40 PM

Maharashtra Jail Police Recruitment : पुण्यात कारागृह पोलीस भरतीची शारीरिक चाचणी प्रक्रिया पार पडत आहे. 531 जागांसाठी ही चाचणी घेतली जात आहे. मात्र आज याठिकाणी काहीसा गोंधळ झालेला बघायला मिळाला आहे. त्यामुळे काही मुलींच्या पायाला दुखापत झाली आहे.

पुणे कारागृह पोलीस भरतीच्या वेळी मोठा गोंधळ उडालेला बघायला मिळाला आहे. या एकूण 531 जागा असलेल्या या भरती प्रक्रियेसाठी तब्बल 3 हजार मुलींची गर्दी झाली होती. या गोंधळामुळे अनेक मुलींच्या पायाला दुखापत झाल्याची सुद्धा माहिती मिळते आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ग्राऊंडवरती ही कारागृह पोलीस भरती होत आहे. 26 मार्चपर्यंत ही भरती प्रक्रिया होणार आहे. या पदासाठी 531 जागा आहेत. मात्र राज्यभरातून करागृह पोलीस भरतीच्या परीक्षेसाठी तब्बल 3 हजार मुली पुण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे भरती प्रक्रियेच्या ठिकाणी गोंधळ उडालेला बघायला मिळाला.

Published on: Mar 19, 2025 06:40 PM