खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क…पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच…
पुण्यात पुन्हा एकदा हायप्रोफाईल रेव्ह पार्टीचा पर्दाफाश झाला असून पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आळंदी-मार्कल रोडवरील तुळापूर परिसरातील एका आलिशान बंगल्यात सुरू असलेल्या ‘प्रोजेक्ट एक्स’ नावाच्या पार्टीवर गुन्हे शाखेने पहाटे छापा टाकला
पुण्यात पुन्हा एकदा हायप्रोफाईल रेव्ह पार्टीचा पर्दाफाश झाला असून पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आळंदी-मार्कल रोडवरील तुळापूर परिसरातील एका आलिशान बंगल्यात सुरू असलेल्या ‘प्रोजेक्ट एक्स’ नावाच्या पार्टीवर गुन्हे शाखेने पहाटे छापा टाकला. या कारवाईत तब्बल 156 जणांना ताब्यात घेण्यात आले असून 2 जणांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही पार्टी सुरू होती. पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर 15 अधिकारी आणि 65 पोलिसांच्या पथकाने 7 जून रोजी पहाटे 2.30 वाजता छापा टाकला. ताब्यात घेतलेल्या 156 जणांमध्ये 107 पुरुष आणि 49 तरुणींचा समावेश आहे. धक्कादायक म्हणजे यातील 3 तरुणींचे वय 21 वर्षांपेक्षा कमी असल्याचे समोर आले. लाखो रुपयांचे मद्य येथे आढळून आले आहेत. यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. येथे मद्य, तंबाखूजन्य पदार्थ आणि गांजा आढळून आला आहे. येथील पार्टीसाठी असलेले तरुण हे कोणत्या भागातून आले याचा तपास सुरू आहे. पार्टीत सहभागी झालेल्या मुला मुलींची कसून चाैकशी पोलिसांकडून केली जात आहे.
तपासादरम्यान पार्टीसाठीचा दारू विक्री परवाना रात्री 11.30 पर्यंतच वैध असल्याचे उघड झाले. मात्र त्यानंतरही पार्टी सुरू ठेवण्यात आली होती. या घटनेमुळे पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे
