Pune Rain : या कारणामुळे इंद्रायणी नदीत जाण्यासाठी वारकऱ्यांनी बंदी
Indrayani River Bridge : पुण्याच्या आळंदीमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीच्या पूलावरील लोखंडी रेलींग देखील तुटली आहे.
पुण्याच्या आळंदीमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीच्या पूलावरील लोखंडी रेलींग देखील तुटली आहे. त्यामुळे आता प्रशासनाने भक्ती सोपान पूल बंद केलेला आहे. तसंच वारकऱ्यांना देखील इंद्रायणी काठी येऊ नका असं आवाहन करण्यात आलं आहे.
दरम्यान, आज पुणे शहरासह ग्रामीण भागात आज सकाळपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे. आळंदीत देखील पावसाचा जोर कायम आहे. त्यातच आळंदीत दर्शन बारीवरील रेलींगचा कठडा तुटला आहे. इंद्रायणी नदीवर असलेल्या भक्ती सोपान पूलाचं रेलींग यामुळे तुटलं आहे. त्यामुळे हा पूल आता प्रशासनाने बंद केला आहे. आळंदीमधून आज संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सुरू होत आहे. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज पंढरपूरकडे प्रस्थान करेल. त्यासाठी वारकरी मोठ्या संख्येने आज आळंदीत दाखल झालेले आहेत. त्यातच हा पूल तुटल्याने वारकऱ्यांची गैरसोय होणार आहे.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

