Pune Rain : पुण्याच्या हिंगणे खुर्दमधील घरात पावसाचं पाणी शिरलं; नागरिकांचे हाल
Pune Weather Updates : पुण्याच्या हिंगणे खुर्दमधील घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं आहे. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
पुण्याच्या हिंगणे खुर्दमधील घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं आहे. घरात पावसाच पाणी शिरल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. याची काही भीषण दृश्य देखील आता समोर आलेली आहे. आज सकाळपासूनच पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. राज्यात अनेक भागांना पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला होता. त्यानंतर आज सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. अद्यापही पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे घरातील सामानाचं मोठं नुकसान देखील झालं आहे. हिंगणे खुर्द परिसरात देखील रस्त्यांना धबधब्यांचं स्वरूप आलेलं आहे. नागरिकांकडून घरात शिरलेलं पाणी काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र वरच्या बाजूला असलेल्या डोंगरवरून मोठ्याप्रमाणात पाणी खाली येत असल्याने पाण्याचा प्रवाह अधिक असल्याचं दिसून आलं आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला

