VIDEO : Pune ST Employee Protest | पुण्यात एसटी कर्मचाऱ्यांचे भीक मागो आंदोलन
राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. आंदोलनच्या पाचव्या दिवशीही आपल्या मागण्या मान्य झाल्या शिवाय आंदोलन मागे न घेण्याच्या निर्णयावर कर्मचारी ठाम आहेत. या आंदोलनामध्ये आता एसटी कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय उतरले आहेत. कुटुंबियांनी कर्मचाऱ्यांच्या समर्थनात रस्त्यावर भीक मागो आंदोलन सुरु केले आहे.
राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. आंदोलनच्या पाचव्या दिवशीही आपल्या मागण्या मान्य झाल्या शिवाय आंदोलन मागे न घेण्याच्या निर्णयावर कर्मचारी ठाम आहेत. या आंदोलनामध्ये आता एसटी कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय उतरले आहेत. कुटुंबियांनी कर्मचाऱ्यांच्या समर्थनात रस्त्यावर भीक मागो आंदोलन सुरु केले आहे. लहान मुलांसह रस्त्यावर उतरत महिलांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरु केली आहे. तसेच थाळी वाजवत राज्य सरकारचा निषेध व्यक्त करत हे भीक मागो आंदोलन केले जात आहे. जोपर्यंत राज्य सरकारमध्ये एसटी महामंडळाचे विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आंदोलन असेच सुरु ठेवणार, अशी भूमिका आंदोलनात सहभागी झालेल्या कुटुंबियांनी घेतली आहे.
Latest Videos
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा

