Swargate Bus Crime Video : स्वारगेट अत्याचार घटनेतील नराधमाचा कारनामा उघड, आरोपी पोलिसांचा गणवेश घालायचा अन्…
पुणे स्वारगेट बस स्थानक येथील अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे यांच्यासंदर्भात चौकशी सुरू असताना पोलीस तपासातून एक-एक माहिती उघड होत आहे.
पुणे स्वारगेट बस स्थानक येथील अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे यांच्यासंदर्भात चौकशी सुरू असताना पोलीस तपासातून एक-एक माहिती उघड होत आहे. आरोपी दत्तात्रय गाडे हा पोलिसांचा गणवेश घालून एसटी स्थानक परिसरात वावरायचा अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. पोलिसांचा गणवेश परिधान केलेले आरोपी दत्तात्रय गाडे याचे फोटो पोलिसांच्या हाती लागले आहेत. यासोबतच आरोपी दत्तात्रय गाडे याच्या मोबाईल क्रमांकाचे पोलिसांकडून विश्लेषण कऱण्यात आलं आहे. इतकंच नाहीतर आरोपी दत्तात्रय गाडे याचा पुण्यातील शिवाजीनगर, स्वारगेट, अहिल्यानगर, सोलापूर आणि शिरूर एसटी बस स्थानकावर वावर असल्याचे तपासातून समोर आले आहे. दरम्यान आरोपी दत्तात्रय गाडे याने याप्रकारचे आणखी काही गुन्हे केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. त्याच्याविरुद्ध तक्रार असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.
नेमकी घटना काय होती?
गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यात एसटीच्या शिवशाही बसमध्ये 26 वर्षाच्या तरुणीवर बलात्काराची घटना घडला. या घटनेनंतर सर्वच राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. स्वारगेट एसटी स्टँड पहाटे साडेपाच वाजले होते. तरुणी पुण्याहून फलटणला जाण्यासाठी स्वारगेट एसटी स्टँडमध्ये आली आणि बसची वाट पाहत बाकावर बसली. त्याच वेळी नराधम दत्तात्रय गाडे तरुणीकडे आला आणि ताई म्हणून कुठे जायचं आहे अशी विचारणा केली. मात्र ज्याने ताई म्हणून तरूणीला आवाज दिला त्याच नराधमाने पहाटेच्या अंधाराचा फायदा घेत तरुणीवर अत्याचार केलेत.
Video : स्वारगेट अत्याचार घटनेच्याच दिवशी नराधमाचं आणखी एक कृत्य उघड, त्याच रात्री त्यानं…