Pune Lockdown | पुणेकरांना दिलासा नाहीच; महापौर नाराज, व्यापारी आक्रमक

पुण्यातले निर्बंध जैसे थे आहेत. त्यामुळे पुण्यातले व्यापारी आक्रमक झाले आहेत. त्यांनी शासनाविरोधात घंटानाद आंदोलन केलंय.

पुण्यातले निर्बंध जैसे थे आहेत. त्यामुळे पुण्यातले व्यापारी आक्रमक झाले आहेत. त्यांनी शासनाविरोधात घंटानाद आंदोलन केलंय. मुंबई आणि पुण्याला वेगवेगळे न्याय का?, असा सवाल करत आमचं जगणं अवघड झालंय, आम्ही आता निर्बंध पाळणार नाही, असा आक्रमक पवित्रा पुण्यातील व्यापाऱ्यांनी घेतला आहे.

सर्व नियमात बसताना पुण्याच्या बाबतीत दुजाभाव का?, असा सवाल करत महापौर मुरलीधर मोहोळ पालकमंत्री एक बोलतात, आरोग्यमंत्री दुसरं तर मुख्यमंत्री वेगळी भूमिका मांडतायत. पुण्याच्या बाबतीत राजकारण होत की काय असं चित्र दिसतंय, असं महापौर म्हणाले. तसंच आजच्या व्यापारी आंदोलनाला आमचा पाठींबा असणार आहे, असंही महापौरांनी सांगितलं.

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI