पुणे शहराला जोडणाऱ्या रस्त्यांवरही वाहनांच्या लांबच लांब रांगा, नेमकं कारण काय?
येथील चांदणी चौक परिसरात प्रचंड वाहतूककोंडीचा प्रश्न अनेक वर्ष तसाच होता. त्यावर काहीच दिवसांपुर्वी काम करण्यात आलं होतं. येथील जुना पुल पाडून कामाला सुरूवात करण्यात आली आहे. मात्र असे असताना आता देखील येथे वाहतूककोंडीचा प्रश्न जैसेथे आहे.
पुणे, 9 ऑगस्ट 2023 । पुणे शहरातील वाहतूककोंडीचा प्रश्न हा केल्या करता संपताना दिसत नाही. येथे दररोज वाहतूककोंडीने अनेकांना त्रास सहन करावा लागतो. तर त्यामुळे अनेकांना नाराजीही व्यक्त केली आहे. येथील चांदणी चौक परिसरात प्रचंड वाहतूककोंडीचा प्रश्न अनेक वर्ष तसाच होता. त्यावर काहीच दिवसांपुर्वी काम करण्यात आलं होतं. येथील जुना पुल पाडून कामाला सुरूवात करण्यात आली आहे. मात्र असे असताना आता देखील येथे वाहतूककोंडीचा प्रश्न जैसेथे आहे. चांदणी चौक परिसरात वाहतूक कोंडी झाल्याने मुंबई – बंगळुरू महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. या वाहनांच्या रांगा तीन ते चार किलोमीटर पर्यंत असून याचा परिणाम आता पुणे शहराला जोडणाऱ्या रस्त्यांवरही होत आहे. Pune Traffic Congestion

