AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमात 9 ते 10 कोटी रुपये... बड्या नेत्याच्या विधानाने मोठी खळबळ

राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमात 9 ते 10 कोटी रुपये… बड्या नेत्याच्या विधानाने मोठी खळबळ

| Updated on: Aug 22, 2026 | 12:49 PM
Share

राहुल गांधींच्या छात्रों की गुंज या पुणे येथील कार्यक्रमावरून भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी काँग्रेसला उद्देशून पाच प्रश्न उपस्थित केले असून, कार्यक्रमाच्या निधीच्या स्रोतांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

राहुल गांधींच्या छात्रों की गुंज या पुणे येथील कार्यक्रमावरून भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी काँग्रेसला उद्देशून पाच प्रश्न उपस्थित केले असून, कार्यक्रमाच्या निधीच्या स्रोतांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. बन यांचा पहिला प्रश्न असा आहे की, पुण्यातील या कार्यक्रमांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला ३० ते ३५ हजार रुपये देण्यामागे नेमके कोण आहे आणि हा पैसा कोण देत आहे, याचे उत्तर काँग्रेसने द्यावे.

दुसरा प्रश्न असा आहे की, जवळपास तीन हजार लोकांना पैसे दिले जात असताना होणारी ही उधळपट्टी नेमकी कुठून आली आणि याचा हिशोब राहुल गांधी व काँग्रेसने द्यावा. तिसरा प्रश्न परदेशी फंडिंगबाबत आहे. एका कार्यक्रमासाठी ९ ते १० कोटी रुपये खर्च होत असताना यामागे फॉरेन फंडिंगचा थेट संबंध आहे का, असे त्यांनी विचारले आहे. चौथा प्रश्न काँग्रेसशासित राज्यांतील कंत्राटदारांच्या व्यवहारातून किंवा कमिशनखोरीतून हे पैसे आले आहेत का, यावर आधारित आहे. काँग्रेसचे कर्नाटक आणि केरळमध्ये राज्य असल्याने त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. शेवटचा, पाचवा प्रश्न राहुल गांधींचे राजकीय रीलॉन्च करण्यासंदर्भात आहे. राहुल गांधींना पुन्हा रीलॉन्च करण्यासाठी काँग्रेसचे बजेट किती हजार कोटी रुपयांचे आहे, असा सवाल बन यांनी केला आहे. या आरोपांवर काँग्रेसकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Published on: Aug 22, 2026 12:49 PM

Follow Us