Rahul Solapurkar Video : ‘लक्षात ठेवा…जर कोणाला तसं वाटत असेल तर…’, ‘त्या’ 2 वादग्रस्त वक्तव्यांनंतर राहुल सोलापूरकरची हात जोडून माफी
अभिनेता राहुल सोलापूरकर याने एकामागून एक अशी दोन वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळासह समाजातून एकच संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळाले. औरंगजेबाच्या तावडीतून सुटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी लाच दिली होती, असं वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकरने वेदांनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मणच होते, असं वक्तव्य केलं आणि नवा जावई शोध लावल्याचे पाहायला मिळाले. सोलापूरकर याने केलेल्या […]
अभिनेता राहुल सोलापूरकर याने एकामागून एक अशी दोन वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळासह समाजातून एकच संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळाले. औरंगजेबाच्या तावडीतून सुटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी लाच दिली होती, असं वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकरने वेदांनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मणच होते, असं वक्तव्य केलं आणि नवा जावई शोध लावल्याचे पाहायला मिळाले. सोलापूरकर याने केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्याने स्वतःहूनच स्वतः टीकेचा धनी बनवलं. मात्र आता राहुल सोलापूरकर याने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून केलेल्या वादग्रस्त वक्तव्यासंदर्भात हात जोडून माफी मागितली आहे. “मी अभिनेता आणि व्याख्याता राहुल सोलापूरकर. पुन्हा सर्व बांधवाशी संपर्क करतोय. 2 स्पष्टीकरण द्यायची आहेत. माझ्या पॉडकास्टमधील 2 वाक्य काढून प्रचंड गदारोळ माजला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्राहून सुटका या प्रसंगाविषयी बोलताना एक शब्द चुकीने गेला होता. मी त्याबद्दल माफी मागितली. माझा तो शब्द हा विषय नव्हता. पण लाच हा शब्द मी चुकून वापरला, ज्याबद्दल मी जाहीर माफी मागितली” पुढे असंही म्हटलं. “आज पुन्हा एक विषय पुढे आलाय. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जे विधान केलंय असा. छत्रपती राजर्षी शाहु महाराजांची भूमिका करताना त्यात एका प्रसंगात एक विषय होता, कोण कुठल्या घरात जन्माला आला यावर त्याची जात ठरत नाही. तर तो काय करतो यावर त्याची जात ठरते. राहुल सोलापूरकर हा प्रामाणिक भारतीय आहे. माझ्याकडून कुठल्याही महाव्यक्तीला कलुषित करण्याचा प्रयत्न स्वप्नातही होणार नाही. मी पुन्हा माफी मागतोय”, असं त्याने म्हटलं.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

