Raigad | एकनाथ शिंदेंचा आदेश धाब्यावर? रायगडमध्ये शिवसेनेची बंडखोरी? महायुतीत नेमकं काय घडतंय?
रायगड विधान परिषद निवडणुकीत महायुतीसमोर बंडखोरीचे आव्हान उभे राहिले आहे. महायुतीतील जागावाटपानुसार रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेली असतानाही शिवसेनेचे नेते महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या अर्जाची निवडणूक प्रशासनाकडून नोंदही घेण्यात आली आहे.

महायुतीने रायगड विधान परिषद मतदारसंघासाठी अधिकृत उमेदवार निश्चित केला असला तरी जुईली दळवी यांच्या उमेदवारीमुळे स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत महायुतीतील सर्व घटक पक्षांनी युतीधर्म पाळावा आणि अधिकृत उमेदवारांनाच पाठिंबा द्यावा, अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या.
मात्र, रायगड विधान परिषद जागेबाबत महेंद्र दळवी हे सुरुवातीपासूनच आग्रही असल्याची चर्चा आहे. त्यामुळे जुईली दळवी यांच्या उमेदवारीकडे केवळ बंडखोरी म्हणून नव्हे, तर स्थानिक स्तरावरील राजकीय नाराजीचे प्रतीक म्हणूनही पाहिले जात आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महायुती या बंडखोरीवर कोणती भूमिका घेते आणि जुईली दळवी उमेदवारी कायम ठेवतात की माघार घेतात, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.