Sunil Tatkare | शेवटी रायगडची निवडणूक बिनविरोध, अनिकेत तटकरे होणार आमदार!

| Updated on: Jun 04, 2026 | 4:24 PM

राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम टप्प्यात विविध मतदारसंघांतील समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत. 17 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत काही ठिकाणी बंडखोरीचे चित्र कायम असले तरी अनेक मतदारसंघांमध्ये पक्ष नेतृत्वाला उमेदवारांची माघार घडवून आणण्यात यश मिळाले आहे.

राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम टप्प्यात विविध मतदारसंघांतील समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत. 17 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत काही ठिकाणी बंडखोरीचे चित्र कायम असले तरी अनेक मतदारसंघांमध्ये पक्ष नेतृत्वाला उमेदवारांची माघार घडवून आणण्यात यश मिळाले आहे. विशेषतः नाशिक विधान परिषद निवडणूक सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असून गोकुळ गीते आणि गणेश गीते यांच्या उमेदवारीमुळे महायुतीसमोर आव्हान निर्माण झाले आहे. या दोन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी वरिष्ठ नेत्यांकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, ठाण्यानंतर आता कोकणातील रायगड विधान परिषद मतदारसंघात महायुतीला मोठा दिलासा मिळाला आहे. रायगडची जागा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. खासदार सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांनी या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज मागे घेण्याची मुदत संपत असताना त्यांच्या विरोधात कोणताही उमेदवार मैदानात नसल्याने त्यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रायगडच्या जागेसाठी महायुतीत मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली होती. शिवसेना नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी ही जागा शिवसेनेला मिळावी यासाठी प्रयत्न केले होते, तर राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे यांनी दावा कायम ठेवला होता. अखेर ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली. त्यानंतर रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबतही चर्चा रंगली असून भविष्यात यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, रायगडसह पुणे, यवतमाळ, ठाणे, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या जागाही बिनविरोध होण्याच्या मार्गावर असून राज्यातील निवडणूक चित्र अधिक स्पष्ट होत आहे.

Published on: Jun 04, 2026 4:23 PM
Follow Us