कोल्हापुरात रेल्वे वर्कशॉममध्ये पार्क केलेल्या बोगीला आग, 50 लाखांचे नुकसान

कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वे वर्कशॉममध्ये असलेल्या बोगीला अचानक आग लागली. रविवारी रात्री अकराच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. ही रेल्वे सर्व्हेसिंग आणि इतर कामासाठी रुळावर पार्क केली होती.

कोल्हापूर : कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वे वर्कशॉममध्ये असलेल्या बोगीला अचानक आग लागली. रविवारी रात्री अकराच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. ही रेल्वे सर्व्हेसिंग आणि इतर कामासाठी रुळावर पार्क केली होती. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहाणी झालेली नाही, मात्र रेल्वे विभागाचे सुमारे पन्नास लाखांचे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशी लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. अग्निशम दलाच्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

Published On - 10:56 am, Mon, 6 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI