Raj Thackeray | राज ठाकरे आणि त्यांच्या आईलाही कोरोनाची लागण

सध्या मिळालेल्या माहितीनुसार राज यांच्यासोबतच त्यांची बहीण आणि आई यांनादेखील कोरोनाची लागण झालेली आहे. सध्या राज यांच्यावर डॉ. जलील पारकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात येस असून तीन तासानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. 

मुंबई : राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झालेली आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ते उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. सध्या मिळालेल्या माहितीनुसार राज यांच्यासोबतच त्यांची बहीण आणि आई यांनादेखील कोरोनाची लागण झालेली आहे. सध्या राज यांच्यावर डॉ. जलील पारकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात येस असून तीन तासानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. राज ठाकरे यांच्या प्रकृतीविषयी खुद्द डॉ. पारकर यांनी ही माहिती दिलीय. “त्यांची प्रकृती चांगली आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या बहिणीलाही कोरोनाची लागणी झाली आहे. दोघेही रुग्णालयात दाखल झाले आहेत. आम्ही त्यांना मोनोक्लोनल अँटिबॉडी कॉकटेल दिले आहे. ते तीन तासांत घरी जातील. त्यांना घरीच क्वॉरन्टाईन केले जाईल. त्यांच्या आईदेखील रात्री रुग्णालयात आल्या होत्या. त्यांनाही आम्ही अँटिबॉडी कॉकटेल दिले आहे. तीन तासानंतर राज यांना घरी सोडले जाईल,” अशी माहिती डॉ. जलील पारकर यांनी दिली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI