Raj Thackeray : अहमदाबाद विमान दुर्घटनेवर राज ठाकरेंनी उपस्थित केले मोठे प्रश्न..
अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एक पोस्ट शेअर करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून अहमदाबाद विमान दुर्घटनेवर प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. ड्रीमलायनर विमानाच्या आधीच्या अपघातांचा दाखला देत त्यांनी हे प्रश्न उपस्थित केले आहेत. 2013 मध्ये अमेरिका आणि युरोपने ड्रीमलायनरचं उड्डाण बंद केलं होतं. एवढ्या तक्रारी असताना डिजीसीएने ड्रीमलायनरला परवानगी कशी दिली? ड्रीमलायनर विमानाचं उड्डाण सरकारने बंद करावं असं राज ठाकरे यांनी म्हंटलं आहे.
यासंदर्भात त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हंटलं आहे की, बोईंगच्या ड्रीमलायनर विमानाबद्दल खूप तक्रारी होत्या. त्यामुळे 2020 ते 23 या काळात अनेकवेळा या विमानांचं उड्डाण थांबवलं गेलं. अमेरिकेपासून युरोपपर्यंत सगळ्या मोठ्या विमान प्राधिकरणांनी जवळपास 3 महिने बोईंग ड्रीमलायनरच्या विमानांचं उड्डाण बंद केलं होतं. मग या विमानांबद्दल एवढ्या तक्रारी असताना देखील आपण ही विमानं का वापरू देत आहोत? अनेक विमान कंपन्यांनी 40 पेक्षा जास्त ड्रीमलायनर विमानांची ऑर्डर दिली आहे. या सगळ्याला सरकारने परवानगी का दिली? ड्रीमलायनर्स जर मृत्यूचा सापळा बनणार असतील तर कुठलाही दबाव सहन न करता याची सेवा खंडित करावी आणि वेळेआधीच ऑर्डर रद्द करावी, असं ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटलेलं आहे.

मुलींच्या शरीरावरून कमेंट्स; पोलीस भरती तयारी करणाऱ्यांना मारहाण अन्..

आदित्य ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल, वांद्रे जमीन पुनर्विकासावरून सवाल

भारतीय नर्स निमिषा प्रियाला दिलासा, येमेनमधील उद्याची फाशी टळली

मुंबईत मुसळधार, अंधेरी सबवे पाण्याखाली; वाहतूक कोंडी
