BMC Election 2026 : मतदानासाठी प्रतीक्षा, पत्नीच्या मागे राज ठाकरे, सहकुटुंब मतदान केंद्रावर, बघा फोटो
राज ठाकरे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. ही निवडणूक ठाकरे बंधूंसाठी महत्त्वाची मानली जात आहे. दुबार मतदारांना रोखण्यासाठी मनसेने भगवा गार्ड तैनात केले असून, सखोल याद्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. नवाब मलिक यांनीही मतदान केले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी सहकुटुंब मतदान केंद्रावर उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली होती. या प्रसंगी राज ठाकरे यांच्यासोबत त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे, मिताली ठाकरे आणि उर्वशी ठाकरे उपस्थित होते. इतर सामान्य नागरिकांप्रमाणे रांगेत उभे राहून त्यांनी लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवला. त्यांच्या मतदानाची दृष्ये टीव्ही नाईन मराठीच्या कॅमेरात कैद झाली.
सध्याची ही निवडणूक ठाकरे बंधूंसाठी अत्यंत महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची मानली जात आहे. तब्बल वीस वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एकत्र सभा घेतल्या होत्या, तसेच विविध शाखांना भेटी देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. या एकजुटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण उदयास आल्याचे चित्र आहे, जे आगामी काळात महत्त्वाचे ठरू शकते. ही निवडणूक मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) भविष्यासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता असून साऱ्यांचं लक्ष आता निकालाकडे लागलं आहे.
Published on: Jan 15, 2026 11:42 AM
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
