VIDEO : Pune | राज ठाकरेंनी केले मनसैनिकाच्या बाळाचे नामकरण, दिला आशीर्वाद

VIDEO : Pune | राज ठाकरेंनी केले मनसैनिकाच्या बाळाचे नामकरण, दिला आशीर्वाद

| Edited By: | Updated on: Dec 16, 2021 | 2:33 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या एका कार्यकर्त्याने राज ठाकरेकडे एक वेगळीच मागणी केली. राज ठाकरे यांनी आपल्या मुलाचे नामकरण करावे असा आग्रह या कार्यकर्त्याने धरला. मुळचा परभणीचा पदाधिकारी असलेला निशांत कमळू हा त्याच्या पत्नीसह पुण्यात आला होता.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या एका कार्यकर्त्याने राज ठाकरेकडे एक वेगळीच मागणी केली. राज ठाकरे यांनी आपल्या मुलाचे नामकरण करावे असा आग्रह या कार्यकर्त्याने धरला. मुळचा परभणीचा पदाधिकारी असलेला निशांत कमळू हा त्याच्या पत्नीसह पुण्यात आला होता. यावेळी सुरुवातीला राज ठाकरे यांनी निशांत कमळू यांना विनम्र नकार दिला. मात्र नंतर राज ठाकरे यांनी या बाळाचे यश हे नामकरण करत आशिर्वाद दिला. राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्याच्या मुलाचे नाव ठेवल्याने एकच चर्चा आता सुरू झाली आहे.