अदानी 10 वर्षांत एवढे मोठे कसे झाले?, राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
अदानी10 वर्षात मोठे कसे होतात? असा सवाल करतानाच दुसर्यांचे व्यवसाय खेचून अदानी मोठे झालेत, असा आरोप राज ठाकरेंनी केलाय. उद्योगपतीची वाढ कशी होते हे देशातील नागरिकांनी समजून घेणं गरजेचं आहे. अदानी हा माणूस उद्या देशाला वेठीस धरू शकतो, असं देखील ठाकरे म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादर शिवाजी पार्कातील सभेत उद्योगपती गौतम अदानी यांच्या अवघ्या 10 वर्षातील वाढत्या साम्राज्याची पोलखोल केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांचा हा मुद्दा खोडून काढताना इतर उद्योगपतींचीही संपत्ती 10 वर्षात कशी वाढली याची यादीच सादर केली. फडणवीस यांच्या या उत्तरावर आता राज ठाकरे यांनी परत पलटवार केला आहे. अदानी10 वर्षात मोठे कसे होतात? असा सवाल करतानाच दुसर्यांचे व्यवसाय खेचून अदानी मोठे झालेत, असा आरोप राज ठाकरेंनी केलाय. उद्योगपतीची वाढ कशी होते हे देशातील नागरिकांनी समजून घेणं गरजेचं आहे. अदानी हा माणूस उद्या देशाला वेठीस धरू शकतो, असं देखील ठाकरे म्हणाले. हे उद्योग उभे करताना गौतम अदानींना अर्थसाहाय्य कुठून झालं? असा सवाल त्यांनी केला.
50 टक्क्यांचा आत आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका!
जिल्हा परिषद निवडणुका कधी? निवडणूक आयोगाकडून तारीख जाहीर
अदानी 10 वर्षांत एवढे मोठे कसे झाले?, ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
जागे रहा! ... तर कानाखाली वाजवा! उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

