Guru Ma Kanchan Giri Live | राज ठाकरेंचं अयोध्येत जंगी स्वागत करणार : गुरु मॉं कांचन गिरी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. कांचन गिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांनी राज यांना अयोध्याला येण्याचं निमंत्रण दिलं आहे. राज यांनी हे निमंत्रण स्वीकारलं असून दिवाळीत अयोध्येत जाण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदू राष्ट्र मजबूत करण्यासाठी राज हे अयोध्येला जाणार आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. कांचन गिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांनी राज यांना अयोध्याला येण्याचं निमंत्रण दिलं आहे. राज यांनी हे निमंत्रण स्वीकारलं असून दिवाळीत अयोध्येत जाण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदू राष्ट्र मजबूत करण्यासाठी राज हे अयोध्येला जाणार आहेत. कांचन गिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांनी आज राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली. यावेळी राज यांनी त्यांचं सपत्नीक स्वागत केलं. त्यानंतर राज आणि महंतांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली. यावेळी जगतगुरू सूर्याचार्याजी यांनी राज यांना अयोध्येत येण्याचं निमंत्रण दिलं. तसेच अयोध्येत येऊन हिंदूराष्ट्राच्या कार्यासाठी हातभार लावण्याची विनंतीही राज यांना करण्यात आली. राज यांनीही हे निमंत्रण स्वीकारलं आहे. राज यांनी दिवाळीत अयोध्येला जाण्याचा निर्णयही घेतल्याचं सांगितलं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI