2 मे रोजी राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर; अनंता सूर्यवंशींच्या कुटुंबीयांची भेट घेणार?

राज ठाकरे हे एक मे रोजी औरंगाबादमधील सभा झाल्यानंतर दोन मेला नाशिक दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. राज ठाकरे हे आपल्या नाशिक दौऱ्यात मनसे नेते अनंता सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची सात्वनपर भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे.

अजय देशपांडे

|

Apr 30, 2022 | 9:40 AM

राज ठाकरे यांच्यासंदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.  राज ठाकरे हे औरंगाबादची सभा अटोपल्यानंतर दोन मे रोजी नाशिक दौऱ्यावर जाणार असल्याची शक्यता आहे. मनसे नेते अनंता सूर्यवंशी यांचे निधन झाले आहे. या पार्श्वभूमीवर ते सूर्यवंशींच्या कुटुंबीयांची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर राज ठाकरे हे नाशिक मार्गे मुंबईला जाणार आहेत.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें