Raj Thackeray : मुंबई पालिका निवडणुकीबाबत राज ठाकरेंचा मोठा दावा, BMC मध्ये 100 टक्के…
मराठीचा मुद्दा घेऊन घराघरात पोहोचा असे आदेश देखील राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना दिले आहेत. इतकंच नाही तर मराठीचा मुद्दा घेऊन जाताना हिंदी भाषिकांचा द्वेष करू नका, असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे यांनी महत्त्वाचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर मनसे मुंबई महापालिका निवडणुकीत 100 टक्के सत्तेत येणार असा दावाही राज ठाकरे यांनी केला आहे. युतीचं काय करायचं ते माझ्यावर सोडा, असं देखील राज ठाकरे म्हणालेत. राज ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना आदेश देताना असे म्हटले की, 20 वर्षानंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो तर तुम्ही एकाच पक्षात का भांडता. हेवेदावे संपवा आणि कामाला लागा, असे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत. मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवा राज यांनी पदाधिकाऱ्यांना हे आदेश दिले आहेत तर मराठीचा मुद्दा पोहोचवताना हिंदी भाषिकांचा द्वेष करू नका असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ठाकरे यांच्या शिवसेने सोबतच्या युतीवर योग्य वेळी बोलेल, असं देखील राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा म्हटलं आहे तर मुंबई महापालिकेत 100% सत्तेत येणार असा दावाही राज ठाकरे यांनी केलेला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजच्या मेळाव्यातून अनेक महत्त्वाची वक्तव्ये केलेली आहे.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...

