मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण…नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!

मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण…नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!

| Updated on: Jun 07, 2026 | 6:33 PM

राज्यातील 17 विधान परिषद जागांच्या निवडणुकीदरम्यान कोकण मतदारसंघाची मोठी चर्चा झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून आलेल्या या जागेवर शिवसेनेकडूनही दावा करण्यात आला होता

राज्यातील 17 विधान परिषद जागांच्या निवडणुकीदरम्यान कोकण मतदारसंघाची मोठी चर्चा झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून आलेल्या या जागेवर शिवसेनेकडूनही दावा करण्यात आला होता. या मतदारसंघातून राजापूरचे माजी आमदार राजन साळवी इच्छुक होते. मात्र, पक्षाने घेतलेल्या निर्णयानंतर त्यांनी पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

अकोला येथे माध्यमांशी बोलताना राजन साळवी म्हणाले की, आपण कोकण विधान परिषदेसाठी निश्चितच इच्छुक होतो. मात्र, पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय आपल्यासाठी सर्वोच्च आहे. त्यामुळे कोणतीही नाराजी नसून आपण पक्षासाठी जोमाने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

भविष्यात एकनाथ शिंदे आपल्या कामाचा नक्कीच सन्मान करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच कोकण विधान परिषदेसाठी पक्षाने आणि आपण केलेल्या त्यागाची भरपाई भविष्यात महाराष्ट्रात निश्चितच होईल, असेही राजन साळवी यांनी सांगितले.

Published on: Jun 07, 2026 6:33 PM
Follow Us