Tv9 Podcast | जगातली दुसऱ्या नंबरची सर्वात मोठी भिंत तिही आपल्या भारतात…!

चीनच्या भिंतीनंतर जगातली सर्वांत मोठी भितं राजस्थानमध्ये आहे. ही भिंत राजसमंद जिल्ह्यातील कुंभारगडावरच्या अंगाखांद्यावरती उदयपूरपासून 80 किलोमीटरवर आहे.

मुंबई : चीनच्या भिंतीनंतर जगातली सर्वांत मोठी भितं राजस्थानमध्ये आहे. ही भिंत राजसमंद जिल्ह्यातील कुंभारगडाच्या अंगाखांद्यावरती उदयपूरपासून 80 किलोमीटरवर आहे. ही भिंत मेवाडचे राजे महाराणा कुंभा यांनी बांधली. अनेक सुंदर वास्तूंसह अवाक् करणाऱ्या या चिलखती तटाची त्यांनी निर्मिती केली. गुजरात आणि मालवा यांच्यातील संघर्षासाठी अरावलीच्या या डोंगररांगावर महाराणा कुंभा यांनी ही भिंत बांधणे सुरु केले. ही भिंत बांधायला सुरु केली की ती कोसळत असे. त्यानंतर एक नरबळी दिल्यानंतर ही भिंत आकारास आली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI