शिंदेगटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.उद्धव ठाकरेंमुळे शिवसेनेची बदनामी झाली, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला आहे. ठाकरे गटाच्या तीन नगरसेवकांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. ये तो बस झाकी है! अभी बहुत कुछ है…, असं रामदास कदम म्हणालेत. 135 देशांमध्ये एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलं की बाळासाहेबांचा मुलगा असक्षम आहे. उद्धवसाहेब तुम्ही मातोश्रीच्या बाहेर पडत नव्हता. 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेत तुम्ही सत्तेत होत काय केलं?, असा सवालही त्यांनी केलाय.