Ramdas Kadam : दोन नग्न साधू, रात्री 12 ची वेळ… स्मशानात माझं, योगेशचं नाव घेऊन बकरा कापला.. परबांचं नाव घेत कदमांचा खळबळजनक गौप्यस्फोट
रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर चंद्रग्रहणाच्या रात्री कोळीवाड्याच्या स्मशानभूमीत कथित बकऱ्याच्या बळीचा गंभीर आरोप केला आहे. कदम यांच्या मते, त्यांच्या आणि योगेश कदम यांच्या नावाचा वापर करून हे कृत्य घडले. परब यांनी यावर खुलासा करावा, अशी मागणी करत कदम यांनी उद्धव ठाकरे यांनाही या प्रकरणी बोलण्याचे आव्हान दिले आहे.
रामदास कदम यांनी शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. चंद्रग्रहणाच्या रात्री कोळीवाड्याच्या स्मशानभूमीत बकरा कापल्याचा आरोप कदम यांनी केला आहे. बघणाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनिल परब यांच्यासारखी व्यक्ती एका बिल्डरसोबत गाडीतून बकरा घेऊन आली होती. त्यांच्यासोबत दोन नग्न बाबाही होते. तिथे रामदास कदम आणि त्यांचे पुत्र योगेश कदम यांच्या नावाचा उल्लेख करत बकऱ्याचा बळी दिला गेला, असे म्हटले जात आहे.
रामदास कदम यांनी अनिल परब यांच्या शिक्षणाचा आणि वकील असण्याचा संदर्भ देत, हे अघोरी कृत्य त्यांच्याकडून अपेक्षित नसल्याचे नमूद केले. ते म्हणाले, “आपण शिकलेली व्यक्ती आहोत, हे अघोरी कृत्य आपल्याकडनं होता कामा नये.” या प्रकरणावर अनिल परब यांनी स्वतः खुलासा करावा, अशी त्यांची मागणी आहे. अन्यथा, आपल्याला नाईलाजाने या घटनेची चौकशी करावी लागेल, असा इशारा रामदास कदम यांनी दिला आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांनाही या विषयावर थेट बोलण्याचे आव्हान दिले आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

