धोब्याच्या बायकोची डिलिव्हरी झाली, त्याने कपडेच दिले नाहीत, रावसाहेब दानवेंचं कॉमेडी भाषण
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात (Maharashtra Sadan) काल 29 जुलैला हा समारंभ पार पडला. यावेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सत्काराला उत्तर देताना तुफान फटकेबाजी केली.
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने स्थान मिळालेल्या महाराष्ट्रातील मंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात (Maharashtra Sadan) काल 29 जुलैला हा समारंभ पार पडला. यावेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सत्काराला उत्तर देताना तुफान फटकेबाजी केली. “राजकरणात सीनियर आणि ज्युनियर असं काही नसतं. कोण कोणत्या पदावर आहे ते महत्वाचे आहे. मी एवढं वर्ष काम केल्यानंतर आता 42 वर्षांनी इथं मंत्री झालो. पण भागवत कराड, कपिल पाटील यांचं बरं आहे. सहा महिन्यात, सहा वर्षात मंत्री झाले”, असं रावसाहेब दानवे म्हणाले.
कुणाला मंत्री होण्याची इच्छा होती आणि कुणी आहे ते टिकवत होतं. डॉक्टर भागवत कराड खासदार झाले सर्वांना आश्चर्य वाटले. त्यावेळी मला हजार लोकांनी प्रश्न विचारले, हे कसे खासदार झाले म्हणून. आता तर हे मंत्री झालेत. मला 42 वर्ष झाले तेव्हा इथे पोहोचलो आणि कराड साहेबांनी इतक्या कमी दिवसात इतके जास्त रन कसे काढले. म्हणून तुम्ही भाग्यवंत आहात, असं रावसाहेब दानवे म्हणाले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

