AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raosaheb Danve : सेनेचं लग्न ठरलं आमच्याशी पळून गेले दुसऱ्यासोबत, येणाऱ्या निवडणुकीत कोथळे काढू-रावसाहेब दानवे

Raosaheb Danve : सेनेचं लग्न ठरलं आमच्याशी पळून गेले दुसऱ्यासोबत, येणाऱ्या निवडणुकीत कोथळे काढू-रावसाहेब दानवे

| Edited By: | Updated on: May 08, 2022 | 5:57 PM
Share

जो मुख्यमंत्री दोन वर्षे मंत्रालयात जात नाही, जो मुख्यमंत्री अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यानं मदत करत नाही, जो मराठा आणि ओबीसींचे आरक्षण टिकवू शकला नाही त्यांच्यासाठी अच्छे दिन आले आहेत जनतेसाठी नाही, असेही दानवे म्हणले.

जालना : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी पुन्हा शिवसेना आणि महाविकास आघाडीवर जोरदार (Mahavikas Aghadi) हल्ला चढवला आहे. शिवसेनेच लग्न आमच्यासोबत लग्न ठरले पण हे पळून गेले आणि दुसऱ्याशी लग्न लावले. असा टोला त्यांनी लगावला आहे. एका मुख्यमंत्री (Cm Uddhav Thackeray) पदासाठी सरकारमधील सर्व आमदार खासदार नाराज आहे. हे काय कोथळे काढतात आमचे, येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांचे कोथळे आम्ही काढू म्हणत त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रतिआव्हान दिले आहे. या राज्यातील जनतेने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना मते दिली परंतु शिवसेनेनं बगावत केली, धोका दिला, असंगाशी संगत केली आणि काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेले आणि या राज्यातील जनतेवर बुरे दिन आणले. जो मुख्यमंत्री दोन वर्षे मंत्रालयात जात नाही, जो मुख्यमंत्री अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यानं मदत करत नाही, जो मराठा आणि ओबीसींचे आरक्षण टिकवू शकला नाही त्यांच्यासाठी अच्छे दिन आले आहेत जनतेसाठी नाही, असेही दानवे म्हणले.

Published on: May 08, 2022 05:57 PM