“आम्हाला जातीयवादी म्हणताहेत, ते आमच्या पंगतीत बसून जेवले अन् …”, भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा पलटवार
भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे. "ममता बॅनर्जी भाजप जातीयवादी आहे,असा आरोप करतात.शरद पवार म्हणतात, भाजपा जातीयवादी आहे, मायावती म्हणतात जातीयवादी आहे, फारूक अब्दुल्ला म्हणतात जातीयवादी आहेत, मग आम्ही जातीयवादी आहोत तर
जालना: भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे. “ममता बॅनर्जी भाजप जातीयवादी आहे,असा आरोप करतात.शरद पवार म्हणतात, भाजपा जातीयवादी आहे, मायावती म्हणतात जातीयवादी आहे, फारूक अब्दुल्ला म्हणतात जातीयवादी आहेत, मग आम्ही जातीयवादी आहोत तर, मी आणि शरद पवार पुलोदमध्ये एकत्र निवडणूक लढवली,फारूक अब्दुल्ला यांचा मुलगा अटलजींच्या सरकारमध्ये मंत्री मंडळात होते, मायावती दोनदा मुख्यमंत्री भाजपमुळे झाल्या,ममता बॅनर्जी अटलजींसोबत रेल्वे मंत्री होत्या, नितीशकुमार भाजपच्या भरवशावर मुख्यमंत्री होते. हे जे आम्हाला जातीयवादी म्हणत आहेत ना, ते आमच्या पंगतीत बसून जेवले आणि खरकटे तोंड घेऊन कुणीकडे गेले पाहा आता”, अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली आहे. “या देशाचे पंतप्रधान 2024 मध्ये नरेंद्र मोदी होणार आहेत”, असा विश्वास देखील रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

