AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ratnagiri Fish Price Hike:  माशांचे वाढलेले दर खवय्यांच्या खिशाला कात्री, कारण नेमकं काय?

Ratnagiri Fish Price Hike: माशांचे वाढलेले दर खवय्यांच्या खिशाला कात्री, कारण नेमकं काय?

| Updated on: Oct 26, 2025 | 2:57 PM
Share

रत्नागिरीत गेल्या आठ दिवसांपासून समुद्रातील वादळसदृश्य परिस्थितीमुळे मासेमारी थांबली आहे. याचा थेट परिणाम माशांच्या दरांवर झाला असून, ते जवळपास दुप्पट झाले आहेत. रविवार असूनही खवय्यांना मोठ्या किमतींना मासे खरेदी करावे लागत आहेत, ज्यामुळे त्यांच्या खिशाला झळ पोहोचत आहे.

रत्नागिरीत समुद्रातील वादळसदृश्य परिस्थितीमुळे मासेमारी क्षेत्रावर परिणाम झाल्याचे चित्र आहे. गेल्या आठ दिवसांपासून मासेमारीसाठी बोटी समुद्रात न गेल्यामुळे मच्छी बाजारात माशांची आवक घटली आहे. याचा थेट परिणाम म्हणून सर्वच प्रकारच्या माशांचे दर जवळपास दुप्पट झाले आहेत. साधारणपणे मोठ्या प्रमाणात माशांची आवक होणाऱ्या मच्छी मार्केट परिसरात सध्या दर कडाडलेले दिसून येत आहेत. आज रविवार असल्यामुळे मोठ्या संख्येने खवय्ये मासे खरेदीसाठी आले होते, परंतु वाढलेल्या दरांमुळे त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. माशांचे वाढलेले दर खवय्यांच्या खिशाला कात्री लावत आहेत.

Published on: Oct 26, 2025 02:57 PM