podcast | एकाच दिवशी बाप-लेकाचा कोरोनामुळे मृत्यू, गुहागरमधील कुटुंब उद्ध्वस्त

Poscast | एकाच दिवशी बाप-लेकाचा कोरोनामुळे मृत्यू, गुहागरमधील कुटुंब उद्ध्वस्त

मुंबई : देशात कोरोनाने हाहा:कार माजवला आहे. या महासाथीमध्ये अनेक लोकांनी आपल्या कुटुंबीयांना गमवलंय. या काळात अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. प्रत्येकाच्या मृत्यूची एक वेगळीच कहाणी आहे. रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातील चिखली येथील एका रिक्षाचालकाचासुद्धा कोरोनामुळे असाच मृत्यू  झाला. या रिक्षाचालकासोबत त्याच्या मुलाचासुद्धा कोरोनाने बळी घेतला. याच रिक्षाचालकाच्या मृत्यूची हादरवणारी कहाणी त्याची रिक्षा सांगतेय. ऐका एकाच दिवशी बापलेकाचा मृत्यू झालेल्या एका कुटुंबाची व्यथा…