Ravindra Chavan : रविंद्र चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्विकारला
Ravindra Chavan News : भारतीय जनता पक्ष प्रदेशाध्यक्ष म्हणून काल निवड झाल्यानंतर आज रविंद्र चव्हाण यांनी पदभार स्वीकारला.
भारतीय जनता पक्षाचे नेते रविंद्र चव्हाण यांची महाराष्ट्राचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून काल निवड करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच रवींद्र चव्हाण यांच्यावर भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, आता त्यांची प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे रविंद्र चव्हाण यांच्यावर आता ही जबाबदारी देण्यात आली आहे. रविंद्र चव्हाण यांच्या निवडीबाबत भाजपाने मुंबईत एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात रविंद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आज रविंद्र चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला आहे. यावेळी मावळते अध्यक्ष्य चंद्रशेखर बावनकुळे यांचीही उपस्थिती पाहायाला मिळाली. दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत रविंद्र चव्हाणांना शुभेच्छा दिल्या आहेत.