Ravindra Dhangekar Video : रवींद्र धंगेकर पक्षप्रवेशाच्या चर्चांदरम्यान स्पष्टच म्हणाले, ‘निर्णय घ्यायचा की नाही ते आपल्या हातात…’
काँग्रेसचे माजी आमदार आणि पुण्यातील डॅशिंग नेते अशी ओळख असलेले रवींद्र धंगेकर हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाणार हे जवळपास निश्चित आहे. पण त्याआधी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने देखील धंगेकरांना ऑफर दिली आहे. यासंदर्भात काय म्हणाले धंगेकर?
काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाणार हे जवळपास निश्चित झाल्याच्या चर्चा आहे. पण त्याआधी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने देखील धंगेकरांना ऑफर दिली आहे. त्यामुळे पक्षप्रवेशाच्या चर्चांना अधिकच उधाण आलं आहे. मात्र सुरू असलेल्या चर्चांदरम्यान धंगेकरांनी टीव्ही ९ मराठीला प्रतिक्रिया दिली. ‘मी काँग्रेसमध्ये आहे आणि काँग्रेसमध्येच राहणार’, असं वक्तव्य रवींद्र धंगेकर यांनी केलं आहे. मी एखाद्याला भेटलो म्हणजे पक्षप्रवेश करणार असं नाही. पक्ष प्रवेशाच्या चर्चा या होतच असतात, असं वक्तव्य करत रवींद्र धंगेकर यांनी पक्ष प्रवेशासंदर्भात होणाऱ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. दरम्यान, रूपाली ठोंबरे यांनी दिलेल्या ऑफर बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले, ‘प्रेमापोटी रूपाली ताई बोलली. ताई बोलली कारण तिला वाटतं आपल्या भावाने आपल्यासोबत काम करावं.’ पुढे ते असेही म्हणाले, मला सगळ्या पक्षात जावं वाटलं तरी मी थोडी जाऊ शकणार आहे. मी एकटाच आहे त्यामुळे जाऊन जाऊन मी किती पक्षात जाणार. काँग्रेस पक्षासोबत मी काम करतोय. काँग्रेससोबत माझा चांगला संवाद आहे. अध्यक्षांशी बोलणं झालंय. मध्यंतरी शिवजंयती होती त्या मिरवणुकीवेळी भगवे कपडे घातले होते. फोटो चांगला आला बाकी काही नाही, असं म्हणत रवींद्र धंगेकर यांनी पक्षप्रेवशाच्या चर्चा फेटाळून लावल्यात. मात्र रवींद्र धंगेकर यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश निश्चित झाल्या अशाही चर्चा सुरू होत्या. यासंदर्भात बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले, ‘निर्णय घ्यायचा की नाही ते आपल्या हातात असतं पण चर्चा तर होतातच. त्या चर्चेतून रूपाली ताईने ऑफर दिली आणि माझ्यासोबतचा फोटो टाकला. एखाद्याला भेटलो म्हणजे आपण त्या पक्षात जाणार असं नसतं.’
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?

