Reserve Bank of India | नोटेवर गांधीजीऐवजी इतर फोटो बदलण्याच्या अफवांचं रिझर्व्ह बॅंकेकडून खंडन

महात्मा गांधी यांच्यांसह रविंद्रनाथ टागोर आणि एपीजे अब्दुल कलाम यांचे वॉटरमार्क वापरण्यात येणार असल्याचं बोललं जात होतं. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तसं विचार करत असल्याचं बोललं जात होतं

Reserve Bank of India | नोटेवर गांधीजीऐवजी इतर फोटो बदलण्याच्या अफवांचं रिझर्व्ह बॅंकेकडून खंडन
| Updated on: Jun 06, 2022 | 8:38 PM

मुंबई : आपल्या भारतीय चलनी नोटांवर आज पर्यंत महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचाच फोटो पाहायला मिळत होता. मात्र यापुढे यात बदल करण्यात येणार असल्याचा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (Reserve Bank of India) सांगण्यात आल्याच्या अफवा पसरवल्या जात होत्या. ज्यात भारतीय चलनी नोटांव असलेला महात्मा गांधी यांच्यांसह रविंद्रनाथ टागोर आणि एपीजे अब्दुल कलाम (APJ Abdul Kalam) यांचे वॉटरमार्क वापरण्यात येणार असल्याचं बोललं जात होतं. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तसं विचार करत असल्याचं बोललं जात होतं. तसेच यासंदर्भातील दोन सेट तयार करण्यात आले असून ते सरकारसमोर सादर केले जातील आणि याबाबतचा अंतिम निर्णय उच्चस्तरीय बैठकीत घेतला जाईल असे वृत्त होते. यावर काही प्रसारमाध्यमांनी वृत्त ही दिलं होतं. मात्र यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून खुलासा करण्यात आला आहे. आपल्या या खुलास्यात नोटांवर असा कुठलाही बदल केला जाणार नसल्याचं आरबीआयकडून सांगण्यात आलं आहे. तसेच यासंदर्भांत आरबीआयने प्रेस नोट काढली आहे. तसेच महात्मा गांधी यांचा फोटो असलेल्या नोटा 1996 पासून बाजारात आरबीआयने आणल्या. तेव्हा पासून नोटांना गांधी सीरिजचं नाव देण्यात आलं आहे. त्यापूर्वी 1969 मध्ये आरबीआयने महात्मा गांधी यांचा फोटो असलेली नोट छापली होती. त्यावेळी गांधी जयंतीनिमित्त त्यांचा फोटो असलेल्या नोटा छापण्यात आल्या होत्या.

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.