‘महात्मा गांधी यांच्या मातेबद्दल बोलणं म्हणजे महिलांचा अपमान’; भिडे यांच्यावर कोल्हापूरची महिला संतापली
यवतमाळ, आमरावती, पुणे येथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आंबेडकरवादी संघटनांकडून त्याचा निषेध व्यक्त करताना आंदोलन केलं जात आहे. याचदरम्यान कोल्हापुरात देखील त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसतर्फे आंदोलनासाठी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.
कोल्हापूर, 29 जुलै 2023 | शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर आता राज्यभरात संतप्त पडसाद उमटत आहेत. यवतमाळ, आमरावती, पुणे येथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आंबेडकरवादी संघटनांकडून त्याचा निषेध व्यक्त करताना आंदोलन केलं जात आहे. याचदरम्यान कोल्हापुरात देखील त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसतर्फे आंदोलनासाठी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी कोल्हापूरात आमदार ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वात भिडे यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली आहेत. यावेळी अशा वक्तव्याकडं सरकारनं दुर्लक्ष करून चालणार नाही, तर यावर कडक कारवाई करावी अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी केली आहे. यावेळी येथे एका महिला कार्यकर्तीनं देखील भिडे यांच्या त्या वक्तव्यावर खरपूस समाचार घेताना, भिडे याला कोल्हापूरी भाषेत चपलेनं मार दिला पाहिजे अशी तिव्र भावना व्यक्त केली आहे.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?

