VIDEO | शिवभक्तांसाठी मोठी बामती!, महाराजांच्या वाघनखांबाबत मुनगंटीवारांची मोठी घोषणा
ब्रिटिश उपउच्चायुक्त अॅलॅन गॅम्मेल यांनी वाघनखे आणि जगदंब तलवार महाराष्ट्र सरकारला देण्यास सकारात्मक प्रतिसाद दर्शवल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आता याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणि जगदंब तलवार महाराष्ट्रात येणार अशी मोठी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. ही घोषणा त्यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात केली होती. त्यानंतर ब्रिटिश उपउच्चायुक्त अॅलॅन गॅम्मेल यांनी वाघनखे आणि जगदंब तलवार महाराष्ट्र सरकारला देण्यास सकारात्मक प्रतिसाद दर्शवल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आता याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे परत देण्यासाठी ब्रिटिश उपउच्चायुक्तांचे पत्र मिळालं आहे. त्यांनी ते पत्र दिलं आहे. तर वाघनखे परत देण्यासाठी ब्रिटिश सरकार सकारात्मक असल्याचे तचे म्हणालेत. तर पुढचा प्रश्न हा जगदंब तलवारीचा आहे. जगदंब तलवार महाराष्ट्रात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशिल असल्याचेही ते म्हणाले.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

