शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
डिजिटल क्रांती घडवल्यानंतर आता जिओ शेअर बाजारात मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे. तब्बल ३० हजार कोटी रुपयांच्या संभाव्य आयपीओद्वारे ११ लाख कोटींच्या मूल्यांकनाचे उद्दिष्ट आहे. यामुळे रिलायन्स समूहात नवा अध्याय सुरू होणार असून गुंतवणूकदारांसाठी ही एक आकर्षक संधी ठरू शकते.
डिजिटल क्षेत्रात क्रांती घडवल्यानंतर रिलायन्स जिओ आता शेअर बाजारात मोठं पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. या संभाव्य आयपीओकडे संपूर्ण बाजाराचे लक्ष लागून राहिले आहे. जिओ सुमारे ३० हजार कोटी रुपयांचा आयपीओ बाजारात आणण्याच्या विचारात असून, यासाठी ११ लाख कोटी रुपयांच्या मूल्यांकनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गेल्या दशकभरात जिओने भारताच्या दूरसंचार आणि डिजिटल क्षेत्रात मोठे बदल घडवले आहेत.
५२ कोटींहून अधिक ग्राहकांचा आधार असलेल्या जिओने स्वस्त इंटरनेट आणि विविध डिजिटल सेवांद्वारे कोट्यवधी भारतीयांना जोडले आहे. या यशामुळे जिओ आता दलाल स्ट्रीटवर आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाली आहे. जिओचा हा आयपीओ प्रत्यक्षात आल्यास रिलायन्स समूहाच्या वाटचालीत एक नवा अध्याय जोडला जाईल, असे मानले जात आहे. यामुळे गुंतवणूकदारांना एक नवी आणि मोठी गुंतवणुकीची संधी उपलब्ध होणार आहे.
