James Lane Controversy : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने पुरंदरेंच्या निषेध पत्रावर दिलेली प्रतिक्रिया, आनंद दवेंचा खुलासा

जेम्स लेनप्रकरणावर बोलताना शरद पवारांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी मौन बाळगल्याचा दावा केला होता. मात्र, शिवशाहीर पुरंदरे यांच्यासह इतिहास तज्ज्ञांनी याप्रकरणी ऑक्सफर्ड प्रेसला ते वादग्रस्त पुस्तक मागे घेण्याचे मागणी करत लिहिलेले निषेध पत्र सादर करून मनसेने पवारांची कोंडी केली.

रचना भोंडवे

|

Apr 14, 2022 | 6:22 PM

मुंबई : जेम्स लेनप्रकरणावर (James Lane Controversy) बोलताना शरद पवारांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी मौन बाळगल्याचा दावा केला होता. मात्र, शिवशाहीर पुरंदरे (Shivshahir Purandare) यांच्यासह इतिहास (History) तज्ज्ञांनी याप्रकरणी ऑक्सफर्ड प्रेसला ते वादग्रस्त पुस्तक मागे घेण्याचे मागणी करत लिहिलेले निषेध पत्र सादर करून मनसेने पवारांची कोंडी केली. आता याच प्रकरणावर हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी आणखी एक खुलासा केलाय. आनंद दवे यांनी पुरंदरेंनी लिहिलेल्या पत्राला प्रतिक्रिया म्हणून आलेलं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसचं पत्रच प्रसिद्ध केलंय. याचबरोबर शरद पवारांनी हे पत्रं बघून खुलासा करावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केलीये.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें