Children Hostage Rohit Arya case : त्या स्टुडिओत नेमकं काय घडलं ? ओलीसांनी सांगितला थरारक अनुभव
मुंबईतील पवई आरए स्टुडिओमध्ये घडलेल्या एका घटनेत मुलांना ओलीस ठेवण्याचा थरारक अनुभव समोर आला आहे. एका साक्षीदाराने सांगितले की, शूटिंगसाठी आलेल्या मुलांना अचानक वरच्या मजल्यावर नेऊन दारांना कुलूप लावले. खाली पालकांच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर परिस्थितीची जाणीव झाली.
पवई येथील आरए स्टुडिओमध्ये नुकत्याच घडलेल्या एका घटनेने खळबळ उडवून दिली आहे. येथे काही मुलांना ओलीस ठेवल्याचा एक थरारक प्रकार समोर आला त्यामुळे एकच गदारोळ माजला. त्या स्टुडिओमध्ये नेमकं काय घडलं, याची माहिती तेथे उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिली.
साक्षीदार महिलेच्या सांगण्यानुसार, ती आपल्या मुलीच्या शूटिंगसाठी स्टुडिओत उपस्थित होते. 26 तारखेपासून ते नियमितपणे तेथे जात होते. काल दिवशी अचानक गोंधळ झाला आणि मुलांना व काही प्रौढांना पहिल्या मजल्यावर बसवले. स्टुडिओच्या कर्मचाऱ्यांना खाली थांबवण्यात आले, तर वरच्या मजल्यावर असलेल्यांना त्यांनी आतून बंद केले. सुरुवातीला हा एखाद्या शूटिंगचा भाग वाटला. मात्र, थोड्या वेळाने खालच्या मजल्यावरून पालकांच्या मोठ्या आवाजात रडण्याचा आवाज ऐकू आला. एका मुलीच्या आजीने तिच्या आईला फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

