Rohit Arya Case : बाथरूमच्या खिडकीतून प्रवेश, ओलीस मुलांच्या सुटकेसाठी पोलिसांचे विशेष ऑपरेशन
पवई येथील आर.ए. स्टुडिओमध्ये 17 मुलांसह दोन नागरिकांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला आहे. सरकारी कामाचे पैसे थकवल्याच्या आरोपावरून त्याने हे ओलीसनाट्य रचल्याचे समोर आले आहे. मुंबई पोलिसांनी विशेष अभियान राबवून मुलांना सुखरूप सोडवले.
मुंबईतील पवई येथील आर.ए. स्टुडिओमध्ये घडलेल्या थरारक घटनेत 17 मुले आणि दोन नागरिकांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला. पोलीस सूत्रांनुसार, रोहित आर्याकडे एअरगन होती आणि तो गोळीबार करेल अशी भीती वाटल्याने पोलिसांनी त्याच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने विशेष अभियान राबवून सर्व ओलिसांची सुटका केली. बाथरूमच्या खिडकीतून उंच शिडीचा वापर करून पोलीस इमारतीमध्ये शिरले आणि त्यांनी मुलांची सुटका केली.
या घटनेनंतर आर.ए. स्टुडिओमध्ये मुंबई पोलिसांची फॉरेन्सिक टीम आणि गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले, पुरावे जमा करण्याचे काम सुरू आहे. रोहित आर्याने ओलीसनाट्य घडवण्यापूर्वी काही ज्वलनशील पदार्थ आणि केमिकल्स स्टुडिओमध्ये आणून ठेवल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

