Rohit Pawar | अजितदादांच्या पक्षातील नेत्यांच्या करंगळ्या का कापल्या गेल्या? अजितदादांची ताकद… रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ
सध्या नाशिकमधील भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरू आहे. अनेक महिलांवर अत्याचार केल्याच्या आरोपांनंतर त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात त्याचे काही व्हिडिओ आणि फोटो समोर आले असून, त्यामुळे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. तसेच, त्याचे काही राजकीय व्यक्तींशी संबंध असल्याचेही समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.
सध्या नाशिकमधील भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरू आहे. अनेक महिलांवर अत्याचार केल्याच्या आरोपांनंतर त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात त्याचे काही व्हिडिओ आणि फोटो समोर आले असून, त्यामुळे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. तसेच, त्याचे काही राजकीय व्यक्तींशी संबंध असल्याचेही समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. त्यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घराबाहेर काळी जादू केल्याचा संशय व्यक्त केला आहे. रोहित पवार म्हणाले की, बारामती आणि मुंबईतील अजित पवार यांच्या घराजवळ अशा प्रकारच्या घटना घडल्याचे त्यांनी पाहिले आहे. तसेच, अजित पवार यांच्या पक्षातील काही नेत्यांच्या हाताला जखमा असल्याचेही त्यांनी नमूद केले आणि या गोष्टीमागे काय कारण आहे, असा सवाल उपस्थित केला. कोणीतरी अजित पवार यांची ताकद कमी करण्यासाठी असे प्रकार करत होते का?, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. पुढे ते म्हणाले की, या सर्व घटनांमागे नेमका काय हेतू होता, याचा तपास होणे गरजेचे आहे. तसेच, अजित पवार यांच्या अपघाताबाबतही संशय व्यक्त करत, तो अपघात होता की घातपात, याचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
Published on: Mar 25, 2026 12:59 PM
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक

