शरद पवार यांच्या नादी कुणी लागू नये, अन्यथा…; रोहित पवार यांचा विरोधकांना इशारा
पिंपरी-चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचारासाठी आमदार रोहित पवार पिंपरी-चिंचवड शहरात आहेत. यावेळी त्यांनी विरोधकांना इशारा दिलाय.
पिंपरी-चिंचवड : “शरद पवार यांचा विचार, त्यांची रणनिती, त्यांची खेळी विरोधकांना समजण्याच्या पलिकडची आहे. त्यामुळे त्यांच्या नादी लागू नये. त्यापेक्षा लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं. ते सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत”, असं रोहित पवार म्हणालेत. “शरद पवारांच्या नादी कोणी लागू नये. त्यांच्या नादी लागलात तर उद्या काय होईल, हे उद्याच कळेल”, असंही रोहित म्हणालेत. ते पिंपरीत बोलत होते. पिंपरी-चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी आज आमदार रोहित पवार पिंपरी-चिंचवड शहरात आहेत. रोहित पवार यांनी किवळे गावातील ग्रामदैवत बाबादेव महाराज यांचं दर्शन घेत प्रचाराला सुरुवात केली. भेटीगाठी, पदयात्रा करत नाना काटे यांचा प्रचार करण्यात येणार आहे. त्यासाठी रोहित पवार, निलेश लंके, आदिती तटकरे नाना काटे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?

