सरकार धोकेबाज आणि विश्वासघातकी; लाडकी बहीण योजनेत रोहित पवारांचे नवे आरोप
आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर तीव्र टीका करत त्यांना धोकेबाज आणि विश्वासघातकी ठरवले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर तीव्र टीका करत त्यांना धोकेबाज आणि विश्वासघातकी ठरवले आहे. लाडकी बहीण योजना आणि एक रुपयात पीक विमा योजनेच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. सरकारने लाडक्या बहिणी आणि शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. यासंदर्भात रोहित पवार यांनी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
आपल्या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी म्हंटलं आहे की, लाडकी बहीण योजनेला देखील भ्रष्टाचारातून सुट्टी दिलेली नाही. जाहिरातींसाथी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असून यात देखील मोठ्या प्रमाणात अपहार सुरू असल्याची चर्चा आहे. 15 ऑगस्ट 2014 सरकारने लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीसाठी 200 कोटींच्या खर्चाचा GR काढला होता. आणि २३ नोव्हेंबर २०२३ रोजी सरकारच्या निर्णयात ज्या संस्थांची नावे आहेत, त्यांना ही कामे माहिती व जनसंपर्क विभागामार्फत देणे अपेक्षित होते, परंतु ५ फेब्रुवारी २०२५ रोजी महिला व बालविकास विभागाने नवीन जीआर काढून लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीसाठी ३ कोटींची मान्यता दिली असल्याचं म्हणत रोहित पवारांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

