Breaking | सत्ताधाऱ्यांकडूनच मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला केराची टोपली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजकीय कार्यक्रमांना गर्दी करू नये असे आवाहन केले आहे. त्यानंतरही शिवसेनेचेच सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी भर पावसात गर्दी जमवून मिरवणूक काढली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजकीय कार्यक्रमांना गर्दी करू नये असे आवाहन केले आहे. त्यानंतरही शिवसेनेचेच सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी भर पावसात गर्दी जमवून मिरवणूक काढली. सांगोल्यातील खवासपूर गावात ही जंगी मिरवणूक पार पडली. गेल्या महिन्यात सांगोल्यात कोरोनाचा प्रकोप सुरु होता. आताही तिसऱ्या लाटेचा धोका असताना अशा कार्यक्रमांमुळे कोरोना वाढण्याची अधिक शक्यता निर्माण झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा धोका कायम असतानाही राजकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने गर्दी केली जात आहे. सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी पाटील यांची सांगोल्यातील खवासपूर या गावात चक्क भर पावसात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीला गावकऱ्यांची तसंच आसपासच्या गावातील नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली होती.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

